गेले कित्येक दिवस, मनात एक व्यक्ती घर करून बसलीये. का कुणास ठाऊक पण ती जवळ असली कि कुठल्या गोष्टीची फिकीर वाटंत नाही, अन ती जवळ नसली कि कशातंही मन रमंत नाही. एक अनाहूत पोकळीच निर्माण होते जणू तिच्या जवळ नसण्याने. मी सातत्याने प्रयत्न करूनही असं का होतंय हे समजू शकलो नाही. मग वाटलं सोडून द्यावा हा फुकाचा अट्टाहास. आज न राहवून वाटलं कि लिहावं तिच्याविषयी काहीसं, मला भावलेलं, रुचलेलं…हा तसा पहिलाच प्रयत्न आहे लिहिण्याचा, तेव्हा तुम्हीही समजून घ्याल अशी भाबडी अपेक्षा ठेवतो.
तिच्याशी झालेली पहिली भेट विसरण्याइतपत फार दिवस नाही उलटलेत अजून. अजूनही मला तो दिवस अगदी स्पष्ट आठवतोय … ऑगस्ट २०१३, नवीन अभ्यासक्रमाचा तो पहिलाच वर्ग होता. तिच्या सोबतीला कुणीतरी आल्याची काही पुसटशी छायाचित्रंही मनःपटलावर गर्दी करताहेत ह्या क्षणी. पण ते फारसं महत्वाचं नाही. त्यावेळेला तिकडच्या गर्दीतलीच एक वाटलेली ती आता माझी फार खास मैत्रीण झालीये, अगदी खास. पण त्याबरोबरंच आणखीही बरंच काही घडलंय ह्या मधल्या वेळेत. कधी प्रत्यक्ष तर कधी virtual जगात झालेल्या संवादांतून बऱ्यांच गोष्टींची देवाण-घेवाण झाली. आणि कधी ती हृदयात घर करून बसली हे कळलंच नाही.
माझ्या मनातल्या भावना तिला सांगण्याचा एक-दोनदा प्रयत्नही केला मी, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष, पण सारे व्यर्थ. आणि कालंच तिला दुसऱ्यासोबत हिंडताना पाहिलं, मनात अगदी धस्स झालं…पूर्वी कधीही असं वाटलं नाही. मला नक्की असं माहिती नाही पण वाटतंय आता सगळंच संपलंय…!! ( हे लिखान २० फेब्रुवारी २०१४ रोजीचं आहे.)
साधारण गौर वर्ण, मध्यम बांधा, साधारण उंची, लांब ( फार नाही ) पण कुरळे आणि काळे केस आणि हे सारं कमी होतं कि काय म्हणून हृदयाला छेद करणारे ते भेदक नयन-कटाक्ष …. ती एक अल्लड मुलगी आहे अजून, कधी emotional fool तर कधी rationally argue करते माझ्याशी. कधी हट्टी तर कधी तितकीच समजूतदार…तिचं हसणं तर तिच्यापेक्षाही अधिक सुंदर !! आणि हो, तू हे वाचत असशील तर सांगतो, जे कुणाच्या सांगण्यावरून तू तुझे केस straightening करवून घेतलेस…मला उगीच आवडलेलं नाहीये ते. पण आपल्या आवडी-निवडी कोण विचारतंय म्हणा. :(
तिच्या आयुष्यात आलेल्या काही कटू प्रसंगानंतरही तिनं ज्या धडाडीने आपलं शिक्षण आणि काम सुरु ठेवलंय, ह्याचा नेहमीच मी आदर करत आलोय. तिचा तो सदैव असा उर्जापूर्ण आणि आनंदमय सहवास चेन्नईत मी सध्या miss करतोय. But कुछ खास गिले-शिखवे नहीं है। In fact , आम्ही भेटलो आणि आमच्यात एवढं सुंदर मैत्रीचं नातं निर्माण झालं ह्यातच मला आनंद आहे.
@ह्या लेखाची नायिका, आयुष्य गेले बरेच दिवस एका अजब पण तितक्याच जीवघेण्या लपंडावात अडकलंय: "आपल्याला जी व्यक्ती हवी असते तिला दुसरंच कुणीतरी आवडतं, आणि आपण ज्या व्यक्तीला हवेहोत ती आपल्याला नाही आवडंत." मला ह्या लपंडावातून सुटण्यासाठी तुझी मदत हवीये. मला बहुतेक तरी तुझं उत्तर माहितीये पण विचार बदललास तर नक्की कळव. मी तुझ्या प्रतिसादाची वाट पाहीन. Nonetheless, जेव्हा-जेव्हा मी पुण्यात येईल तेव्हा-तेव्हा तुझी भेट नक्की घेईल ह्यात शंका नसावी.
मला माहितीये ती हा blog नक्की वाचणारे !! तेव्हा वाचकहो, माझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा अखेरचा प्रयत्नं. काही सकारात्मक सिग्नल मिळाल्यास तुम्हाला नक्की कळवीन. पण जर असं घडलं नाही (आणि ह्याची अधिक शक्यता आहे ) तर कमीत कमी मला माझे विचार आणि भावना व्यक्तं केल्याचं समाधान राहील, कारण मी हे जाणतो कि आपण जेवढं अधिक वैयक्तीक बोलतो किंवा लिहितो तेवढं ते अधिक वैश्विक होत जातं.
With my unstinting love ..
शैलेश